‘चुंबक’ माणसातल्या विवेकावरचा विश्वास अधिक दृढ करत नेतो!
नाना प्रकारचं चुंबकत्व आपल्याला सतत खेचत असतं. कधी ते स्वार्थाचं असतं, कधी सूडाचं, तर कधी हव्यासाचं. त्यातून तात्पुरतं सुख मिळाल्यासारखं वाटतंदेखील. पण त्याचं शल्य मात्र सतत डाचत राहतं, आतून कुरतडतं. त्याच वेळी एक दुसरं चुंबकत्व आपल्याला आतून खेचत असतं- निरागसतेचं, विश्वासाचं आणि माणूसपणाचं. जे आपल्या वाट चुकलेल्या मनाला विवेकाचा मौल्यवान रस्ता दाखवतं आणि नितळ माणूसपणावरचा विश्वास अबाधित राखतं.......